मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील प्रसिद्ध व्यापारी नंदलाल बिरदीचंद बेदमुथा यांनी त्यांचा ६८ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. निःस्वार्थ रुग्ण सेवा करणाऱ्या आनंद सेवा केंद्रास त्यांनी तब्बल १ लाख रुपये किंमतीच्या ६८ रुग्ण उपयोगी साहित्याची भेट दिली. शैलेश बेदमुथा, कल्पेश बेदमुथा आणि बेदमुथा परिवारा तर्फे हे रुग्णउपयोगी साहित्य मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेला भेट देण्यात आले.
गेल्या १८ वर्षापासून मनमाड शहरात अविरतपणे नित्य व निःस्वार्थ रुग्ण सेवा, रक्तदान शिबीर,आयोजन करणाऱ्या सेवाव्रती आनंद सेवा केंद्राला ६८ रुग्ण उपयोगी वस्तू समर्पित भेट देण्याच्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मनमाड जैन श्रावक संघाचे संघपती रिखबशेठ ललवाणी, प्रसिद्ध उद्योगपती पोपटशेठ सुराणा, उद्योगपती सुभाषशेठ बेदमुथा, सत्कारमूर्ती नंदलालजी बेदमुथा, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीनभाऊ पांडे, माजी नगराध्यक्ष बब्लूभाऊ पाटिल, नामको बँक संचालक सुभाषभाऊ नहार, प्रसिद्ध उद्योगपती सुनील कासलीवाल, विश्वस्त संजय ललवाणी, मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, माजी नगरसेवक अमजद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना आनंद सेवा केंद्राचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक कल्पेश बेदमुथा यांनी केले नंदलालजी बेदमुथा यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने कोणताही राजकीय सामाजिक स्वार्थ न ठेवता आयोजित केलेल्या या सेवा उपक्रमाचे, व आनंद सेवा केंद्राच्या आरोग्य सेवा कार्याचे यथोचित कौतुक नितीन पांडे, नरेश गुजराथी, संदीप देशपांडे, डॉ सुनील बागरेचा, सुभाष नहार राजेंद्र पारिक संदेश बेदमुथा आदी मान्यवर वक्त्यांनी आपले मनोगत तून केले.
तर संघपती रिखबशेठ ललवाणी यांनी आनंद सेवा केंद्र हे कोणताही भेदभाव न करता मात्र लोक कल्याण म्हणून सर्व धर्म, सर्व पंथ यांचे साठी करीत असलेल्या आरोग्य सेवा कार्याचा गौरव करीत बेदमुथा परिवाराच्या सेवा कार्या बद्दल ऋण व्यक्त केले. सत्कारमूर्ती नंदलाल बेदमुथा व सर्व मान्यवराचे हातून फीत कापून सुमारे एक लाख रुपये पेक्षा जास्त किंमती चे ६८ रुग्ण उपयोगी साहित्य वस्तू (कमोड चेअर, वॉकर, बेड, आदि )चे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी हे रुग्ण साहित्य मोफत रुग्णापर्यंत ने आण करणाऱ्या हिरामण सोनवणे, एकनाथ पवार, प्रकाश खताळ, आदित्य पवार आदीचा सत्कार मान्यवराचे हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला सुरेशशेठ लोढा, कांतीलाल लुणावत, सुनीलशेठ भंडारी, बाळूकाका हिरण, रमेशअण्णा हिरण, किसनदादा बंब, संजूभाऊ चोपडा, राकेश ललवाणी, उमेश ललवाणी, मदन लुणावत, संजूभाऊ मुथा, गुलाब बुरड, मनोज छाबडा, परेश राका, अजित बरडीया, विजूशेठ बरडीया, ठाकुरसिंग गोहिल, बाळू भंडारी, नाबेडा सर, शांतीकाका गांधी, संजूभाऊ आबड, जितुभाऊ चोरडिया, मुन्नाभाऊ ललवाणी, राजाभाऊ ताथेड, दिनेश बेदमुथा, अक्षय सानप, सचिन व्यवहारे, अमित लोढा, नईम खान, रिजवान खान, सचिन जैन, गोपी कौराणी, मुक्तार शेख, जमील सय्यद, बापू जोशीसह बेदमुथा परिवार तील पोपटशेठ बेदमुथा, प्रकाश बेदमुथा, विजूशेठ बेदमुथा, रतीबशेठ बेदमुथा, दिलीप बेदमुथा, साहेबचंद बेदमुथा, कैलास बेदमुथा, गौतम बेदमुथा, मनोज बेदमुथा, सचिन बेदमुथा, नितीन बेदमुथा, हार्दिक बेदमुथा, आदी प्रमुख मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन आनंद सेवा केंद्रातर्फे कल्पेश बेदमुथा, योगेश भंडारी, दिपक शर्मा, नितीन आहेरराव, संजय गांधी, विनय सोनवणे, चेतन संकलेचा, ललित धांदल, अनुप पांडे, प्रमोद भाबड, देवेंद्र मुळे आदींनी केले बेदमुथा परिवारा तर्फे सामाजिक ऋण फेडणेचे भान राखत आयोजित केलेल्या या अभिनव, अनोख्या जन्मदिनाच्या कार्यक्रमाचे मनमाड शहारात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.