मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – गॅस दरवाढी विरोधात मनमाड मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने रस्त्यावर चूल मांडत आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणा बाजी करत केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. केंद्रसरकरने घरगुती सिलेंडर साठी ५० रुपये तर व्यवसायिक सिलेंडर मध्ये ३५० रुपये एवढी वाढ केल्याने सर्वच स्थरातील सामान्यांना फटका बसत असून, जीवनावश्यक वस्तूच्या दरवाढीने नागरिक त्रस्त असल्याने ही दरवाढ कमी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात शिवसेनेचे नेते गणेश धात्रक, संतोष बळीद, पिंटु नाईक, माधव शेलार, सुनील पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. महिला पदाधिका-यांनी रस्त्यावर चुल मांडत या आंदोलना सरकारचा निषेध केला.