मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितभाऊ सुराणा यांना सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाचा मानाचा जीवन साधना गौरव पुरस्कार २०२३ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १० फेब्रुवारी, २०२३ रोजी विद्यापिठाच्या प्रांगणात ७४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने सन्मानाने प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, प्रतिभावंत संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, समाजसेवक व उद्योगपती सायरन पुनावाला, पोपट पवार, गंगाधर पानतावणे, जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर, जेष्ठ साहित्यिक द मा .मिरासदार, अर्थतज्ञ नरेंद्र जाधव तसेच ज्येष्ठ समाजसेवक शांतीलालजी मुथा इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुराणा यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.