मंगळवार, ऑक्टोबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

३७५ कोटीच्या मनमाड – करंजवण पाणी पुरवठा योजनेचे १३ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन; आमदार सुहास कांदे यांची पत्रकार परिषदेत माहिती

फेब्रुवारी 4, 2023 | 6:43 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230204 WA0212 2 e1675516372997

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड शहरासाठी अत्यंत महत्वपुर्ण समजल्या जाणा-या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनमाड येथे १३ फ्रेबुवारी होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य़मंत्र्यांसह मंत्री येणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ३७५ कोटीची असलेल्या ही योजना १८ महिन्यात पूर्ण होणार असून सध्या ११ किमी पाईप लाईन टाकण्यात आली आहे, तर याच दिवशी तालूक्यातील अन्य कामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे.

मनमाड शहर गेल्या ५० वर्षांपासून पाणी टंचाईशी झुंजत आहे. पण, येथील पाणीप्रश्नाकडे कधीही गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. पण, आ. सुहास कांदे यांनी या योजनेचा पाठपुरावा करुन ती मंजुर करुन त्याचे कामही सुरु केले. या योजनेतून शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकणार आहे. रेल्वेचे मोठे जंक्शन व मध्यवर्ती ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनमाड शहारात पाण्याचा प्रश्न हा नेहमी कळीचा मुद्दा होता. सुमारे एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या शहरातील नागरिकांना शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या वागदर्डी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. १९७४ साली या धरणाची निमिर्ती करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे तीस ते चाळीस हजार होती. त्यामुळे लोकांना रोज पाणी मिळत होते. कालांतराने शहराची लोकसंख्या वाढत गेल्यामुळे १९८७ साली पालखेड धरणातून सुमारे ९ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन सुरू झाली. पालखेड धरणातून रोटेशनद्वारे पाटोदा साठवणूक तलावात पाणी घेतले जाते. तेथून पंपिंग करुन सदर पाणी वागदर्डी धरणात आणल्यानंतर शहरात वितरीत केले जाते. वागदर्डी धरणाची अगोदर ९० दशलक्ष घनफूट क्षमता होती. त्यानंतर सांडव्याची भिंत वाढविण्यात आल्यामुळे धरणाची क्षमता ११० दशलक्ष घनफूट झाली. असे असले तरी धरण बांधल्यापासून त्याच्यातून गाळ काढण्यात आला नाही. तर धरणाऱ्या पाणलोट क्षेत्राच्या स्त्रोताच्या ठिकाणीच अनेक गावात पाझर तलाव बांधण्यात आल्यामुळे हे धरण लवकर भरतच नाही. त्यामुळे ७४ किमी अंतरावर असलेल्या पालखेड डाव्या कालव्यातून मनमाडच्या धरणाला पाणी रोटेशनद्वारे मिळते या पाण्यावरच शहराला पूर्णपणे अवलंबून रहावे लागते. पण, आता या योजनेमुळे थेट पाणी मिळणार आहे.

रेल्वेचे जंक्शन, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय अन्न महामंडळाचे धान्य साठवण ठेवणारे डेपो, ऐतिहासिक रेल्वे वर्कशॉप, विविध ऑईल कंपन्यांचे प्रकल्प, आणि शीख धर्मियांच्या सुप्रसिद्ध गुरुद्वारेमुळे मनमाड शहराची देशाच्या नकाशावर आगळीवेगळी ओळख आहे. इतक्या वेगवेगळ्या अर्थांनी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण सध्या पाणीटंचाईचे माहेरघर म्हणूनही या शहराला ओळखले जाते. पण, पाण्यामुळे शहराचा विकास खुंटला होता. पण, आता या योजनेमुळे विकासाला चालणा मिळणार आहे. त्यामुळे या महत्वपूर्ण योजनेचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आळंदी येथे ८ फेब्रुवारी रोजी होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सोहळा’ पुढे ढकलला

Next Post

पेठ – त्र्यंबकेश्वर – घोटी रस्ता दुरुस्ती कामाची स्थगिती उठविली

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

पेठ - त्र्यंबकेश्वर - घोटी रस्ता दुरुस्ती कामाची स्थगिती उठविली

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011