मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आशिया खंडातील सर्वात मोठे असलेल्या नाशिकच्या मनमाड येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडावूनला केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री यांनी भेट देत पाहणी केली. या पाहणीत नाशिक जिल्ह्यात रेशन धान्य पुरवठा करतांना वाटपात त्रुटी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने तेथील अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले..केंद्र सरकार रेशन धान्य वेळेवर पाठवत असतांना वाटपात विलंब का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच नागरिकांच्या तक्रारी वाढल्या म्हणून यावं लागलं, मायक्रो प्लॅनिंग करा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी समन्वय साधा व लोकांना वेळेत रेशन धान्य पोहोचवा, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या..यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेवून भारतीय खाद्य निगमच्या गोडावूनची पाहणी करत आढावा घेतला..