मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड-नांदगाव मार्गावर हिसवळ शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत का काळविटाचा मृत्यू झाला. या मार्गाचे रस्त्याचे काम झाल्याने वाहने सुसाट धावत असतात, अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असलेले हे काळविट रस्ता ओलांडून जात असतांना वाहनाच्या जोरदार धडकेने काळविट जखमी होऊन रस्त्याच्या कडेला उडत मृत झाले. रस्त्याने जाणा-या नागरीकांनी याची माहिती वनविभागाला कळविली आणि मृत काळविटाला त्यांच्या ताब्यात दिले.