मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतक-याने काढून ठेवलेला २५ ट्रॉली मका शेतात ठेवलेला असतांना अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास त्याला आग लावल्याची घटना समोर आली आहे. मनमाड पासून जवळ असलेल्या भार्डी गावातील विनोद सरोदे यांच्या शेतात हा प्रकार घडला. रात्री लघू शंकेसाठी उठलेल्या सरोदे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरड करत घरातील लोकांना उठवले. त्यानंतर आजू-बाजूच्या लोकांच्या मदतीने आग लागलेल्या मक्याला बाजूला करत उर्वरीत मका वाचवला. याप्रकरणी मनमाड पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.