मनमाड – मनमाड शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर वाटचाल करणार्या मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे दरवर्षी स्व.लोकमान्य टिळक व स्व.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ५० वर्षापेक्षा जास्त परंपरा लाभलेल्या या स्पर्धेला गत वर्षीअधिक महत्त्व होते कारण स्वर्गीय लोकमान्य टिळक यांची २०२० मध्ये १०० वी पुण्यतिथी होती कोविड या विषाणूचा प्रार्दुभाव व लॉकडाऊनच्या संकटात देखील मनमाड सार्वजनिक वाचनालयाने लोकमान्य टिळकांच्या या १०० व्या पुण्यतिथीचे स्मरण ठेवून स्पर्धेची परंपरा राखत मनमाड शहरातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्या लेखनाला व वक्तृत्वाला वाव मिळावा या उद्देशाने गत वर्षी ऑनलाईन कथाकथन, वक्तृत्व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. मनमाड शहरातील इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते आणि स्पर्धेच्या नियमानुसार मनमाड शहरातील सर्व १४ माध्यमिक विद्यालयातील सर्व इयत्तेतील विध्यार्थीनी कोरोना संकट काळात ही या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद दिला आणि या ऐतिहासिक स्पर्धेची परंपरा अखंड ठेवत सुमारे ३२४ विध्यार्थीनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला यात निबंध स्पर्धेत २५६ तर वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेत ६८ विध्यार्थी सहभागी झाले. स्पर्धकांकरीता मान्यवर परिक्षकांनी अंतिम दिलेला निकाल खालील प्रमाणे
वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक –
कु.सायली हेमंत सोनवणे (मरेमा विद्यालय), द्वितीय क्रमांक -कु.रिया नितीन गुप्ता(छत्रे न्यू इंग्लिश स्कूल) तृतीय क्रमांक-कु.श्रावणी सुनील गवळी(छत्रे न्यू इंग्लिश स्कूल) प्रथम उत्तेजनार्थ – ऋषीकेश संतोष गवळे (मरेमा विद्यालय) द्वितीय उत्तेजनार्थ -कु.पूर्वा प्रशांत लाळे,(छत्रे न्यू इंग्लिश स्कूल ) तृतीय उत्तेजनार्थ – कु. श्रावणी गणेश डमरे,(संत बार्णबा हायस्कूल)
कथाकथन स्पर्धा –
प्रथम क्रमांक – कु.देवयानी विद्याधर वाघ ( छत्रे न्यू इंग्लिश स्कूल) द्वितीय क्रमांक – कु.संस्कृती प्रशांत माळी ( के. आर .टी. विद्यालय) तृतीय क्रमांक -कु. शुभ्रा अमोल गुजराथी (गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल) प्रथम उत्तेजनार्थ – कु.श्रावणी सुनील गवळी (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल) द्वितीय उत्तेजनार्थ – कु.सोनिया जयंत पांडे (के.आर.टी. विद्यालय) तृतीय उत्तेजनार्थ- कु.मानसी नरेंद्र जोशी(के. आर. टी. विद्यालय)
निबंध स्पर्धा (मोठा गट इयत्ता ८ वी ते १० वी )-
प्रथम क्रमांक – ऋषीकेश संतोष चितुळे( संत झेवीयर्स हायस्कूल) द्वितीय क्रमांक- कु.मानसी मंगेश वाणी (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल) तृतीय क्रमांक – कु. सायली हेमंत सोनवणे (मरेमा विद्यालय) प्रथम उत्तेजनार्थ-कु.मानसी सतीश मढे (संत झेवीयर्स हायस्कूल) द्वितीय उत्तेजनार्थ- कु.देवयानी विद्याधर वाघ(छत्रे न्यू इंग्लिश स्कूल) तृतीय उत्तेजनार्थ विभागून १)कु.श्रध्दा संतोष ठाकरे ( सरस्वती विद्यालय) २) धनंजय गोविंदा बिरारी (संत झेवीयर्स हायस्कूल)
निबंध स्पर्धा (लहान गट इयत्ता ५ वी ते ७ वी )
प्रथम क्रमांक- दर्शन दिपक हिरण (के. आर. टी. विद्यालय) द्वितीय क्रमांक -कु.निशा देवराम बोरसे (मरेमा विद्यालय) तृतीय क्रमांक- नील विद्याधर वाघ (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल) प्रथम उत्तेजनार्थ -कु. शुभ्रा अमोल गुजराथी( गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल) द्वितीय उत्तेजनार्थ -कु.कार्तिकी संजय गवळी (छत्रे न्यू इंग्लिश स्कूल) तृतीय उत्तेजनार्थ विभागून १) कु. अदविका अनिल बोडके (गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल) २) कु वैष्णवी प्रशांत पाटील (के. आर .टी .विद्यालय ) मान्यवर परिक्षकांच्या वतीने मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष प्रदिप गुजराथी, सुरेश शिंदे, संचालक नरेश गुजराथी, प्रज्ञेश खांदाट, आदीनी हा स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे व सर्व विजेत्या विध्यार्थ्यांनचे अभिनंदन केले आहे सार्वजनिक कार्यक्रम ना परवानगी मिळाले नंतर या स्पर्धेचा बक्षीस वितरण करण्यात येईल यंदा ही अश्याच प्रकारे स्पर्धचे आयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे करण्यात येणार आहे