मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भिलाटी मधील लोकेश सोनवणे हा चौथीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काल सायंकाळी खेळता खेळता अचानक तो बेपत्ता होता. घरच्यांनी शोध घेऊन ही तो सापडला नाही. अखेर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आल्यानंतर पोलीस सकाळ पासून त्याचा शोध घेत असताना सायंकाळी ४ च्या सुमारास त्याचा मृतदेह संशयास्पद रेल्वे फिल्टर हाऊस जवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस व नातेवाईक घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी एक करवत सापडली आहे. याच दरम्यान पोलिसांना आरोपी बाबत महत्वाचे धागेदोरे मिळाले असून पोलीस अधिक तपास करीत आहे. या हत्येमागे नेमके कारण काय याचा तपास करीत आहे.