मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथून जवळ असलेल्या नागापूर येथील प्राचीन पुरातन नागेश्वर मंदीराची दान पेटी फोडल्याची घटना रात्रीच्या वेळेस घडली. चोरट्याने मंदीराच्या मुख्य दरवाजेचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत गाभा-या बाहेर असलेली दान पेटी फोडत त्यातून मोठी रक्कम चोरुन नेली आहे. दानपेटी फोडत असल्याचा चोरट्याचा प्रताप सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. मंदीराची दान पेटी फोडल्याच वृत्त समजताच नागापूर गावात खळबळ उडाली असून मनमाड पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहे.