मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा जपत -आज रेड्यांच्या टकरीचे आयोजन करण्यात आले होते..यंदा ही परंपरे नुसार रेड्याच्या टकरी संपन्न झाली. गवळी समाज आणि दूध उत्पादक एकत्रित येत टकरींच आयोजन करत असतात. वर्षभर रेड्याला चांगल्या प्रकारे खाऊ घातले जाते आणि मग टकरीच्या (झुंज) दिवशी त्याची ताकद पाहिली जाते. केवळ मनमाडच नाही तर बाहेरगावहून रेडा मालकांनी त्यांचे रेडे येथे टकरी साठी आणले होते. काही रेड्यांच्या झुंजी कित्येक वेळ सुरु होत्या. काही मात्र झुंज होण्या अगोदरच पळून गेले. यंदा जिंकणा-या रेडा मालकांना ट्रॉफी बरोबरच मोठ्या रकमेचे बक्षिस देण्यात आले..भगवान महर्षी वाल्मिकी स्टेडियमवर रंगलेल्या या टकरी पाहण्या साठी लहानांपासून वृध्दां पर्यंत सर्वानी मोठी गर्दी केली होती. या टकरीत रेड्यांचे शिंगही एकमेकांमध्ये अडल्याचे बघायला मिळाले.