मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील प्रसाद बाळू झालटे हा १७ वर्षीय मुलगा मनमाड येथील कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे. गुरुवारी दुपारी १२ च्या दरम्यान कॉलेज मधून बाहेर पडल्यावर तेथून तो एका व्यक्तीच्या मोटारसायकल वर बसून रेल्वे स्थानका पर्यंत गेला. मात्र तो घरीच परतला नसल्याने त्याचा शोध घरच्यांनी घेतला. अखेर मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मनमाड पोलिसात दाखल झाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.