मनमाड – कोरोनामुळे लग्नाचे स्वरुप बदलले असले तरी लग्नात सप्तपदी कायम आहे. पण, काकडे परिवाराने या सप्तपदी बरोबबर आणखी तीन पद जोडत आपल्या घरचा लग्न सोहळा सोशल वेडिंग म्हणून साजरा केला. या लग्न सोहळ्यात पर्यावरण व ग्रंथ चळवळीला बळ देण्याचे काम केले. तर सिमेवर लढणा-यां सैनिकांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या प्रती आदरही व्यक्त केला.त्यामुळे काकडे कुटुंबियांची हे व-हाड चांगलेच चर्चेत आले.
असे दिले पर्यावरणाला बळ
मनमाड शहरातून चिरंजीव प्रसाद संजय काकडे यांच्या लग्नाचे वऱ्हाड भडगाव पाचोरा कडे निघाले आणि रस्त्यात सर्व वऱ्हाडी मंडळींनी चाळीसगाव भडगाव रोड वर रस्त्याच्या किनारी बीज रोपण केले, कडुलिंब चिंच अशा सारख्या झाडांच्या बियांचे रोपण करण्यात आले, नवरदेव प्रसाद संजय काकडे यासह पुरुष महिला बालक सर्व वऱ्हाडी मंडळींनी बीजारोपण केले व पर्यावरण चळवळीस हातभार लावला
वाचन चळवळीस प्रोत्साहन
व-हाड लग्न घरी पोहोचल्यानंतर सायंकाळच्या श्रीमंती पूजनाच्या वेळी व्याही भेटीमध्ये प्रत्येक मंडळींना मनमाडकर कवी आणि लेखक यांचे आत्मचरित्र कथा संग्रह व काव्यसंग्रह भेट देण्यात आले त्याचप्रमाणे कार्यक्रमात ग्रंथप्रदर्शनही मांडण्यात आले, मनमाडकरांच्या पुस्तकांमध्ये कवी डीवायएसपी. समिर सिंह साळवे, संदीप देशपांडे ,प्रदीप गुजराथी, सदाशिव सुतार, कवी जनार्दन देवरे, कै. डॉक्टर सी.एच. बागरेचा यासह मान्यवरांची पुस्तके वाटण्यात आली. अशाप्रकारे ग्रंथ चळवळ आणि वाचन चळवळीस प्रोत्साहन देण्यात आले.
नवविवाहितांनी घेतले भारतीय सैन्याचे आशीर्वाद
दिवसभरात लग्न सोहळा आटोपल्यानंतर वराड पुन्हा मनमाड कडे रवाना झाले आणि मग वराड थांबले ते भारतीय सैन्य दलाचा जवान म्हणजेच सैनिक ज्ञानेश्वर सोनवणे यांचेकडे सर्वप्रथम नवरदेव आणि नवरी यांनी भारतीय जवानास भारतीय संस्कृती प्रमाणे नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. आपण भारतीय सैनिक सीमेवरती जीवाची बाजी लावून आम्हा नागरिकांचे संरक्षण करत असतात देशाचे संरक्षण करतात म्हणूनच आम्ही सर्व भारतीय नागरिक सुरक्षित आहोत आपल्या आशीर्वादाने आम्ही नवविवाहीत, संसाराची सुरुवात करू इच्छितो आणि त्यासाठीच आपणास आणि प्रातिनिधिक स्वरूपात सर्व भारतीय सैन्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी आम्ही आपला सत्कार करू इच्छितो अशी विनंती केल्यानंतर जवान ज्ञानेश्वर सोनवणे यांना हार श्रीफळ त्याचप्रमाणे वस्त्र व मिठाई देऊन त्यांचा सत्कार केला. सर्व वऱ्हाडी मंडळींनी भारतीय सैन्यास आम्हाला आपला अभिमान आहे गर्व आहे असे सांगत भारतीय सैन्याप्रती आदर व्यक्त केला.
मनमाडला परतले
या सर्वा सोहळ्याला मनमाड येथील उद्योजक कार्तिक चव्हाण,पंजाब राव चव्हाण यांचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे लग्नाच्या निमित्ताने लग्न सोहळा साजरा करतानाच पर्यावरण रक्षण वाचन प्रेरणा , ग्रंथ चळवळ आणि भारतीय सैन्य दलाप्रती आदर भाव या गोष्टीचे सामाजिक भान राखत काकडे परिवाराचे व-हाड नववधूस घेऊन मनमाडला परतले.