अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आशिया खंडातील सर्वात मोठे अशी ओळख असलेल्या मनमाड मधील एफसीआय मध्ये परराज्यात रेल्वे व्दारे येणारे धान्य साठवणूक करण्यासाठी मोठमोठी गोदाम आहे. येथे धान्य भरण्यासाठी आलेला एक ट्रक रॅक वर जाऊन धडकल्याने अपघात झाला, या अपघात ट्रकची कॅबिन चेपली गेल्याने ट्रक चालक त्यात अडकला. यावेळी आजूबाजूला काम करीत असलेले कामगार धाऊन आले. त्यांनी ट्रक चालकास बाहेर काढले.