अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड शहर आणि परिसरात आज दुपारी झालेल्या पावसाने अनेकांचे चांगलेच हाल झाले. या पावसाने शहरातील छत्रे न्यू इंग्लिश स्कुलच्या प्राथमिक विभागातील इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या वर्गात मध्ये पाणीच पाणी घुसल्याने विद्यार्थ्या बरोबर शिक्षकांची चांगलीच त्रेधा उडाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. याचबरोबर शहरातील अनेक भागात पाणी साचलेले असल्याने या पाण्यातून जाण्याची वेळ नागरिकांवर आली.









