मनमाड – गेल्या वर्षांपासून कोविड या महामारीमुळे सर्व लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शाळा सुद्धा बंद आहे. तरी मनमाड येथील गुड शेफर्ड शाळेने कुठल्या ही प्रकारचे फी माफी केली नाही. विेशेष म्हणजे सवलत सुद्धा द्यायला नकार दिला. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. या नाराजीमुळे पालकांनी पालक संघर्ष समिती स्थापन केली. या समितीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या समितीने शाळेला वारंवार निवेदने देऊन सुद्धा शालेय प्रशासन कोणीही तक्रार ऐकत नाही, त्यामुळे समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघर्ष समितीला ऍड. सुधाकर मोरे,प्रोफेसर इंगळे सर ,शिवसेना उपप्रमुख कयाम शेख,प्रवीण व्यवहारे सर ,अनुप बेदमुथा ,डॉ.झाल्टे मॅडम ,सोहेल जाफरी,प्रविण मोरे ,सादिक शेख आदींंनी पाठींबा दिला आहे. शाळेविरुध्द आंदोलनाची तारीख व वेळ लवकरच निश्चित केली जाणार असल्याचे संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी दिले आहे.