अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मान्सूनपूर्व पावसाने दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आज मनमाड शहर आणि परिसरात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू होता. सकाळ पासूनच तापमानात वाढ झालेली होती. दुपारनंतर मात्र आकाशात ढगांची गर्दी होऊन वादळ सुरू झाले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसू लागला. जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होताच नेहमी प्रमाणे वीज मात्र गायब झाली. पावसामुळे मात्र हवेत गारवा निर्माण होऊन वातावरण आल्हाददायक झाले होते. जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरातील इंडियन हायस्कुलच्या काही वर्गांचे पत्र उडाले तर काही ठिकाणी झाडे पडल्याचे वृत्त आहे. पावसामुळे मात्र हवेत गारवा निर्माण होऊन वातावरण आल्हाददायक झाले होते.