अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड येथील जय भवानी व्यायाम शाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर याने पंचकुला हरियाणा येथे सुरू असलेल्या चवथ्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करत चुरशीच्या लढतीत सुवर्णपदक पटकावले. स्नॅच मध्ये ९९ किलो व क्लिन जर्क मध्ये १२१ किलो असे एकूण २२० किलो वजन उचलून मुकुंद सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. खेलो इंडिया स्पर्धेतील मुकुंदचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. मुकुंदला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ सुनील बागरेचा, प्रा दत्ता शिंपी, छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जी. धारवाडकर, अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर. एन. थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका सौ. पोतदार एस. एस. यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.