अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड येथील आश्विनी नगर गुजराथी मळा परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे विद्युत पोलावरील तुटलेल्या तारेमुळे मीराबाई सुरेश गिडगे यांच्या मालकीच्या दोन शेळ्यांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. काल सायंकाळी मनमाड परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अश्विनी नगर येथील परिसरामध्ये तुटलेल्या विद्युत तारेमुळे दोन शेळ्यांचा मृत्यू झाला, परीसरातील काही नागरिकांनी सांगितले की त्यांनी या कमकुवत झालेल्या विद्युत तारे बाबत अनेक वेळेला मनमाड येथील विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहीती देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळेच हा प्रकार घडला असल्याचे नागरिकांना सांगितले.