अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड मध्ये पावसाची हजेरी लावल्यामुळे बाजार खरेदी साठी आलेल्यांची तारांबळ रविवारी उडाली. पावसाची चातका प्रमाणे वाट पाहणा-या मनमाडकरांना अचानक आलेल्या पावसाने सुखद धक्का दिला. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या उकाड्याने घामाच्या धारांनी भिजत असलेल्या नागरीकांना आज काहीसे पावसात भिजण्याची वेळ आली. दुपारच्या सुमारास अचानक ढग जमा होऊन सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि पावसाने तासभर अधून-मधून मध्यम स्वरुपाची हजेरी लावली.आज रविवारचा आठवडे बाजार भरलेला असल्याने बाजारात खरेदी साठी आलेल्या नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली, तासभर पडलेल्या पावसाने हवेत सुखद गारवा निर्माण झाला होता.