अजय सोनवणे , मनमाड
मनमाड जवळ असलेल्या पानेवाडीमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या प्रस्तावित नवीन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जागा मोजणीसाठी आलेल्या भूसंपादन व कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी विरोध करत पिटाळून लावले. २४ वर्षापूर्वी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची एचपीसीएल कंपनीने फसवणूक केली होती. त्यामुळे या कंपनीवर आमचा विश्वास नसल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकऱ्यांबात लेखी करार होत नाही, तोपर्यंत आम्ही जमीन मोजणीस विरोध करू या भूमिकेवर शेतकरी ठाम आहे. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.