अजय सोनवणे, मनमाड
मनमाड – २५ मे ते २९ मे या दरम्यान शिवसेना पक्षातर्फे शिव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे, शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात खासदार अरविंद सावंत तसेच शिवसेना उपनेते म्हाडा अध्यक्ष विनोद घोसाळकर हे शिवसंपर्क अभियानाचे नेतृत्व करत असून येत्या काळातील निवडणुका लक्षात घेता शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासून तयारीला लागावे व शिवसेनेचे विचार तसेच ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय घराघरापर्यंत पोहोचवावेत हा या मोहिमेचा उद्देश आहे. यानिमित्ताने शनिवार २८ मे रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय, मनमाड येथे शिवसंपर्क अभियान मेळावा घेण्यात येणार आहे
याप्रसंगी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, पक्ष निरीक्षक अनिल डेरे, वैभव सावंत तसेच नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास आण्णा कांदे उपस्थित राहणार आहे. या वेळी मनमाड शहरातील नगरसेवक, पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिकांनी या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.