मनमाड – वीज महावितरण कंपनीच्याच्या हलगर्जी बेजबाबदार कारभारा विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा भाजपने दिला आहे. भाजपने वीज वितरणच्या तक्रारीबाबत म्हटले आहे की, गेल्या दोन महिनापासून मनमाड शहरातील सर्व सामान्य वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार व हलगर्जीपणा मुळे त्रस्त झाले असून, दिवसभरातून अनेक वेळेला वीज जात असते. गेल्या काही दिवसात रात्री वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा फार मोठा मनस्ताप शहरवासीयांना त्यातल्या त्यात ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर वापर करत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना व आरोग्य व्यवस्थेला बसत आहे.
या सर्व प्रश्नांबाबत भाजपने म्हटले आहे की, या बाबत मनमाड शहर भाजपाने आक्रमक भूमिका घेत भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे व मनमाड भाजपा शहर अध्यक्ष जयकुमार फुलवानी यांच्या नेतृत्वामध्ये शहर भाजपाच्या शिष्ठ मंडळाने महावितरण कंपनीच्या मनमाड विभागीय कार्यालय प्रमुख अधिक्षक अभियंता एस.ए .तडवी यांची भेट घेऊन या गैर कारभार बदल तक्रार केली. कोरोनाच्या काळात झालेली ही शिष्ट मंडळ भेट सर्व कोरोना नियमांचे पालन करून सामाजिक अंतर ठेऊन संपन्न झाली.मनमाड शहर भाजपाने वीज वितरण कंपनीच्या बेजाजाबदार कारभाराचा पाढा या प्रसंगी वरिष्ठांन पुढे वाचला. मनमाड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वीज जाण्याचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. दिवसातून अनेक वेळेला वीज प्रवाह खंडित होत असतो. याविषयीची कोणतीही पूर्वसूचना ग्राहकांना दिली जात नाही, वास्तविक बघता जवळपास सर्वच ग्राहकांचे भ्रमणध्वनी क्रमांक वीज वितरण कंपनीकडे आहेत, त्यावर पूर्व कल्पना दिल्यास नागरिकांना नियोजन करणे सोपे होऊ शकते.वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी ग्राहकांना कोणतीच विजेच्या पुरवठा संबंधीची माहिती देत नाही, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर वीज वितरण कार्यालयाचा दूरध्वनी कधीच लागत नाही, परिणामी नागरिकांना कोणतीही माहिती मिळू शकत नाही. वीज बिलाच्या देयकांच्या वसुली बाबत आग्रही असलेले वीज वितरण विद्युत पुरवठा मात्र कार्यक्षम रीतीने देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.
याचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध, आजारी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अवलंबून असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना सातत्याने बसत आहे. मनमाड शहरातील भाग- २ मधील भागात वीज विताराण कंपनीच्या हलगर्जी पण मुळे व ऑक्सिजन आता पर्यंत तीन पेक्ष्या जास्त कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे ही गंभीर बाब असून या दुर्दैवी मृत्यू साठी महावितरण जबाबदार आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने मनमाड शहराच्या पाणी वितरणाचे नियोजन कोलमडून पडते असून, २०-२० दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे,
दुष्काळग्रस्त गाव अशी ओळख असलेल्या शहरवासीयांना महावितरण कंपनीच्या हलगर्जी पण मुळे पाणीपुरवठा उशिरा झाल्याने मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. मनमाड शहरातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराची दूर अवस्था त्वरित दुरुस्त करण्यात यावी, नागरिकांच्या संपर्क साठी land line टेलेफोन ऐवजी मोबाईल फोनची व्यवस्था २४ तास करण्यात यावी आगामी काळात येणाऱ्या पावसाळ्याच्या धर्तीवर दुरुस्तीचे कामे त्वरित करण्यात यावी ही कामे करताना ऑक्सिजन मशीन द्वारे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांचा विचार करून ही दुरुस्ती करावी.
मनमाड शहर साठी नगर चौकी भागात नव्याने मंजूर झालेल्या सब स्टेशनच्या निर्माणाचे कार्य त्वरित सुरु करण्यात यावे वरील मागण्याची गंभीरतेने दाखल ना घेतल्यास महावितरण कंपनीच्या विरोधात कोणताही पूर्व इशारा ना देता मनमाड शहर भाजपा रस्त्यावर उतरेल आणि त्यातून निर्माण होणा-या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला महावितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार राहतील.
मनमाड भाजपाच्या वतीने नितीन पांडे व जयकुमार फुलवानी यांनी सदर चर्चेत वीज ग्राहकांची तक्रार मांडली वरील पदाधिकाऱ्यान सह या शिष्ठ मंडळात भाजपा शहर सर चिटणीस एकनाथ बोडके,नितीन आहेरराव ,शहर चिटणीस मकरंद कुलकर्णी, भटके विमुक्त मोर्च्याचे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा, भाजपा अल्प संख्यांक आघाडीचे शहर अध्यक्ष जलील अन्सारी बुढन बाबा शेख, प्रमोद जाधव आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विभागीय अधिक्षक अभियंता एस. ए. तडवी यांनी भाजपा च्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यावर त्वरित कारवाईचे आश्वासन दिले आहे.