मनमाड – शहरातील कॅम्प भागातील वृन्दावन कॉलनी येथील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या बिल्डिंगच्या पोर्चमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन दुचाकी जळाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. या गाड्या नेमक्या कशा मुळे जळाल्या याचे कारण समजू शकले नाही. मात्र गाडीच्या वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट होऊन, वाढत्या उष्णतेमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.