अजय सोनवणे, मनमाड
मनमाड – नांदगाव विधानसभेचे आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मनमाड शहराची विकासगंगा ठरू पाहणाऱ्या करंजवण योजनेसाठी २५७.१५ कोटींची मंजुरी मिळवली होती. तिची वाढीव मंजुरी मिळवण्यासाठी परत त्यासाठी प्रयत्न करून वाढीव निधीनुसार ३११.८० कोटीच्या निधीला महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरोतथान अभियानांतर्गत मंजुरी मिळवण्यासाठी आमदारांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. लवकरच या योजनेचे टेंडर प्रोसेस सुरू होऊन उद्घाटन करणार असल्याचे सुतोवाच आ.सुहासआण्णा कांदे यांनी केले. त्याचबरोबर या योजनेसाठी १५ टक्के लोकवर्गणी ही नगरपालिकेला अदा करावी लागणार आहे. नगरपरिषेदेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ती सुद्धा वर्गणी माफ करण्याची मागणी आमदारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबतही सहानुभूतीपुर्वक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी आमदार कांदे यांना दिले आहे. या योजनेला वाढीव मंजुरी मिळाल्यामुळे मनमाडकरांना दिलेल्या वचनाची वचनपूर्तीच पूर्ण होत असल्याचा आनंद आमदार कांदे यांनी व्यक्त केला.