मनमाड – श्री गणेश ज्वेलर्स मनमाडचे संचालक सुनील गणेशमलजी भंडारी व सौ. पवनबाई सुनील भंडारी यांच्या ४० व्या लग्नाच्या वाढदिसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत भंडारी परिवाराने उमराणे येथील गो शाळेला ४ टन चारा उपलब्ध करून दिला. या वाढदिवशी मनमाड जवळील उमराणे रोड येथील सेवा संकल्प गोशाळा व दिव्यांग समूह कुंभार्डे यांना परिवाराने भेट दिली. त्यानंतर ललित भंडारी व जयेश भंडारी यांनी आपल्या आई वडीलाच्या ४० व्या लग्नाचा वाढदिवस गो शाळेत गो मातेच्या सानिध्यात साजरा केला. दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात गो मातेसाठी चाऱ्याची उपलब्धता अल्प असते. आपली ही गो माते प्रती जबाबदारी लक्षात घेता, आपणही मदतीचा हातभार लावावा अशी इच्छा भंडारी कुटुंबीयांची होती. या इच्छेप्रमाणे वाढदिवसाचे निमित्त साधून ही भेट देऊन अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी गो शाळेचे प्रमुख महेश भाऊ चीमनपुरे व देवरे मॅडम यांनी गोशाळा व समूहाच्या विषयी माहिती देऊन भंडारी परिवाराचे आभार व्यक्त केले. यापुढे ही आपण अशीच गो मातेसाठी मदत करावी. तसेच समाजतील सर्वांनी असेच पुढे येऊन गो शाळेला मदत व गो मातेची सेवा करावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाला सौ.दीप्ती ललित भंडारी, सौ.पुनम जयेश भंडारी, केतन देवरे, कुवर सर, अनिल शिंदे, लखन जगताप आदी उपस्थित होते.