मनमाड – भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा किशोर व्यवहारे हिने ४० किलो वजन गटात नवीन ७ राष्ट्रीय विक्रमांची नोंद करुन सुवर्णपदक पटकावले आणि राष्ट्रीय स्तरावर मनमाडसह नाशिक जिल्हाचाही झेंडा रोवला. ही स्पर्धा सध्या भुवनेश्वर येथे सुरू असून आंकाक्षाने ५८ किलो स्नॅच व ६९ किलो क्लिन अॅण्ड जर्क असे एकूण १२७ किलो वजन उचलून नव्या ७ राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली आणि सुवर्ण पदक देखील पटकावले.
तिने केलेल्या या कामगिरीचा हा व्हिडीओ बघा.