मुंबई – करंजवण -मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी प्रकल्प समितीने मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. ही प्रकल्प संमितीची बैठक मंत्रालयात आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत मनमाड पाणी पुरवठा योजना मंजुरी साठी मंत्रालयात २५ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक साहेब यांच्या दालनात बैठक झाली. त्यात मनमाड पाणी पुरवठा योजना बाबत सर्व आवश्यक असलेल्या पूर्तता करून सदर योजना प्रशासकिय मान्यता मिळणे कामी शासन स्तरावर सादर करण्यात आली. मंजुरी मिळण्या अगोदर प्रकल्प समितीची बैठक होणे आवश्यक असल्याने सदर बैठक आयोजित करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. यासाठी अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. पण, या बैठकीत ते य़श आ. कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाले.
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी निवडून आल्या पासून मनमाड पाणी पुरवठा योजना मंजुरीसाठी चंग बांधला होता. त्यांचा नेहमीच पाठपुरावा सुरू होता, आमदारांनी या योजनेशी संबंधित असलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून तसेच मंत्रालयीन स्तरावर आपले वजन वापरून आणि खऱ्या अर्थाने मनमाड शहराच्या पाणी प्रश्नाची विदारक परिस्थिती सर्वांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आज त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
प्रकल्प समितीने एकमुखाने मनमाड पाणी पुरवठा योजनेस मान्यता दिली आहे. सदर बैठकीस नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक साहेब, वित्त विभागाचे सचिव पांडुरंग जाधव,सह सचिव नगर विकास विभाग, मुख्याधिकारी मनमाड सचिन पटेल, प्रकाश नंदनवरे, CPDM मुख्य अभियंता, अलेवड साहेब, कक्ष अधिकारी मंत्रालय सुबोध मोरे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी अधिकारी उपस्थित होते.