मनमाड – येवला रोड लगत असलेल्या कॅम्प विभागातील महावितरण कार्यालय शेजारी असणारे एटीएममध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान महावितरण कार्यालयाचे दोन टूबलाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरा ही त्यांनी फोडला आहे. महावितरण येथे रात्रपाळीत कार्यरत असलेले शांताराम वाघ यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने आरडाओरड करून स्थानिक लोकांना गोळा केले. यामुळे जवळील साहित्य तिथेच सोडून अज्ञात चोरटे फरार झाले. असल्याची माहिती समोर येत आली आहे. तर दुसर्या घटनेत शहरातील टक्कर मोहल्ला येथे एका हॉटेल मधील ५२ हजार किंमतीचे स्वयंपाकाचे भांडे कारागिरांने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी सईदाबी अब्दुल रहेमान यांनी मनमाड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी करत आहे.