मनमाड – मनमाड जवळील हडबीची शेंडीवर गिर्यारोहकांच्या तांत्रिक पथकातील दोन जणांचा खाली कोसळल्यामुळे मृत्यू झाला तर एक गिर्यारोहक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. अहमदनगरच्या इंद्रप्रस्त ट्रेकर्स या कमर्शियल ग्रुपच्या वतीने हडबीची शेंडी या सुळक्यावर आरोहण मोहीमेचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यात १८ जण यात सहभागी झाले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला.
या पथकात मुलींचाही सहभाग होता. दुपारपर्यंत सर्व सहभागींचे यशस्वी आरोहण झाल्यानंतर १५ जण खालच्या टप्प्यात उतरले. तर शेवटचे तीघे जण उतरण्याच्या बेतात असतांना तांत्रिक पथकाचा प्रमुख अनिल वाघ आणि मयूर मस्के हे दोघे खाली कोसळले व त्यांचा मृत्यू झाला. तर प्रशांत पवार जखमी झाला. त्याला मनमाड येथे उपचारासाठी साठी तातडीने हलविण्यात आले. या अपघाताचे वृत्त कळताच कातरवाडी येथील ग्रामस्थांनी हडबीची शेंडी वर धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.