चांदवड – मनमाडहून – नाशिककडे इंधन भरुन जाणा-या टँकरच्या कॅबिनला अचानक आग लागल्याची घटना मनमाड – चांदवड रोडवरील हरनुल टोल नाक्याजवळ घडली. चांदवड व मनमाड येथील अग्निशमन दलाने तातडीने ही आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटन टळली. या टँकरमध्ये ३० हजार लिटर इंधन होते. त्यात १५ हजार पेट्रोल, तर पंधरा हजार लिटर डिझेल होते. पानेवाडी येथील भारत पेट्रोलियमच्या डेपोतून हा टँकर भरुन निघाल्यानंतर अवघ्या अर्धा तासात ही आग लागली. या आगी मागील कारण मात्र समजू शकले नाही. पण, गाडीतील शॅार्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे.