मनमाड – अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ॲमेझॉन यांनी ऑनलाईन माध्यमातून नशिली पदार्थाचे विक्री केली त्याबद्दल त्याच्यावर मध्यप्रदेश येथे गुन्हा दाखल झालेले आहे. तसेच पुलवामा हल्ल्यामध्ये जे केमिकल वापरले गेले होते ते देखील ॲमेझॉन या कंपनीने ऑनलाइन विकलेले होते. हा फार मोठा राष्ट्रद्रोह आहे. त्यासाठी ॲमेझॉन या कंपनीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी सर्कल कार्यालय मनमाडला कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स शाखा मनमाड व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.तसेच कपडा व फुटवेअर वर वाढवलेले जीएसटी चे दर पूर्ववत करण्यात विनंती निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे.
यावेळी प्रास्ताविक कॅटचे कल्पेश बेदमुथा यांनी केले. मनमाड शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष सुरेशशेठ लोढा,अनीलजी गुंदेचा सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अरुणभैय्या सोनवणे ,उपाध्यक्ष योगेश भंडारी, महासंघाचे खजिनदार मनोज जंगम ,ज्येष्ठ व्यापारी गुरुजितसिंग कांत,शांतीकाका गांधी परेश बुरड,कुमार मेहानी,बलबीरसींग कांत , दिपु चावला, सुनील छाब्रिया, कैलास लोढा, अभिजित लोढा, हुसेनभाई शेख, प्रमोद भाबड, कमलेश लोढा, जसवीतसिंग ठकराल रितेश लोढा आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कल्पेश बेदमुथा यांनी मानले.