मनमाड – भारतीय रेल्वे व रेल्वे मंत्रालय तर्फ स्वच्छता पंधरवडा साजरा करत असून भुसावळ विभाग अंतर्गत मनमाड रेल्वे स्टेशन तर्फे सदर स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता,व प्लस्टीक निर्मूलन बाबत जनजागृती करण्यात करिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात एक शिक्षक व शैक्षणिक संस्था म्हणून सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रीय कर्तव्य,देशाचे व समाजाचे देखील आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव ठेवूनमनमाड शहरातील शैक्षणिक संस्था सेंट झेवियर हायस्कूल या शाळेने संबधीत रेल्वे स्थानक प्रमुख व आरोग्य निरक्षक स्टेशन प्रमुख राजेश सहारे यांच्या विनंतीला मान देऊन शाळेचे मुख्याध्यापक फादर सँबी कोरिया व सुपरवायझर सिस्टर शैला पेगडो व निकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक दत्तू जाधव, अशोक गायकवाड सुधाकर कातकडे, हेमंत वाले, विजय मोहिते सर तसेच शिक्षिका सौ,अंजलीना झेवियर सौ लिना जाधव,सौ योगिता गोडळकर सौ एलिझाबेथ शेल्टे सौ,रचना आहेर व विद्यार्थी बालकलाकरांनी शुक्रवारी सकाळी ११ मनमाड रेल्वे स्थानक येथे स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत “एक कदम स्वच्छता की ओर”( स्वच्छता कि ज्योत जागी रे—–) ही लघु नाटिका सादर केली. रेल्वे स्टेशन प्रमुख,व आरोग्य निरक्षक स्टेशन प्रमुख राजेश सहारे इतर सर्व अधिकार वर्ग तसेच संस्थेचे मॉनेजर फा.डायन लोबो , फा.लॉईड ,केंद्रसमन्वयक रविंद्र घुगे सर , दिपक भावसार सर,सेंट झेवियर शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ,मनमाड नगरपरिषद शिक्षण मंडळ यांनी या पथनाट्यात सहभागी शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी बालकलाकरांचे अभिनंदन केले.
https://youtu.be/-RVJ0earKF4