मनमाड – शहरातील श्री.खंडेराव मंदिरासमोर असलेल्या महात्मा फुले कॉम्पलेक्समधील वरील मजल्यावर जेवणासाठी बसण्याच्या करणावरुन रात्रीच्या सुमारास किरकोळ बाचाबाची होऊन एकाने चाकू सारख्या धार-धार शस्त्राने वार केल्याने सुनील(सोनू) शंकर महाजन याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून शहरात कायदासुव्यस्था बिघडत चालली असल्याने नागरिकांत संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान सदर घटनेतील आरोपी फरार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील महात्मा फुले कॉम्पलेक्स असून येथे रात्रीच्या सुमारास मयत सुनिल उर्फ सोनू शकंर महाजन,वय-२७,रा.गायकवाड चौक,मनमाड आणि त्याचा मित्र अतिश हे दोघे जेवणासाठी कॉंमलेक्सच्या वरच्या मजल्यावर गेले असता त्या ठिकाणी अगोदर जगदिश उर्फ जग्गु दादा,रा.गरूड वस्ती,मनमाड हा बसला होता. सुनिलने तु आमच्या नेहमीच्या जागेवर का बसला ? असे विचारल्याने जगदिशला राग येवून त्याने त्याच्या जवळील चाकुने सुनिलच्या पोटात खुपसुन वार करून जिवे ठार मारले. या प्रकरणी मयताची आई ज्योती शकंर महाजन यांनी मनमाड पोलिस स्थानकात फिर्याद दिली असुन भादंवि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे,पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी घटनास्थळी भेट पुढील सूचना दिल्या आहे.सदर अरोपी हा फरार झाला असुन पुढील तपास उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.