मनमाड – मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने वीज मंडळाच्या गेल्या १० ते १५ दिवसांपासून सुरू असलेल्या गलथान कारभारा विरोधात आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात आली होती. यानंतर कार्यकारी अभियंता तावडे साहेब यांनी विनंती करून शिवसेना शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले होते.
सदरील बैठक तावडेसाहेब यांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा, शहरातील जुनाट झालेली वायरिंग, पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे, वागदर्डी फिडरवर वाढलेल्या लोडमुळे वारंवार फेल होणे, नवीन सबस्टेशनच्या निर्मितीचे थांबलेले काम सुरू करणे, सध्या कोविड परिस्थिती गंभीर असल्यामुळे अचानक एखादे फिडर बंद पडल्यास काम पूर्ण होईपर्यंत वीज पुरवठा त्वरित सुरू करण्यासाठी पर्यायी व्यवस्था व इतर अनेक तक्रारी बाबत सखोलपणे चर्चा होऊन यावर करावयाच्या उपाय योजना संबधी वीज वितरण कंपनीचे अभियंता तावडे, सहाययक अभियंता शिंदे यांनी माहिती देऊन लवकरात लवकर सदरील कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पूर्तता करून जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे अश्वासित केले.
आमदार सुहास कांदे यांनाही यासाठीचा प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगितले. यावेळी मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने जि.संघटक राजाभाऊ भाबड, जि.उपप्रमुख संतोषभाऊ बळीद,जेष्ठ नेते अल्ताफबाबा खान, शहरप्रमुख मयुरभाऊ बोरसे, नगरसेवक प्रमोद पाचोरकर ता.संघटक सुभाष माळवतकर, शहर संघटक महेंद्र गरूड उपस्थित होते. या संदर्भातील प्रस्ताव तयार केल्यास शिवसेना शहराच्या वतीने आमदारांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे शहरप्रमुख मयुर बोरसे यांनी सांगितले.