मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील महावितरणच्या कंत्राटी कामगारांना कामावरुन कमी केल्याने या सर्व कामगारांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयाजवळ विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
कंत्राटी कामगारांच्या मागण्या संदर्भात समेट प्रक्रिया सुरु असतांना कायदेशीर कामगारांना कामावरुन कमी करणे, कामगार आयुक्तांनी कंत्राटी कामगारांना कामावर रुजून करण्याचे आदेश दिलेले असतांना कामावर रूजू न करुन घेणे, कंपनीच्या परिपत्रकात कोणतीही शासकीय आयटीआयची अट नसतांना महावितरणने लागू केलेली आटीआयची अट रद्द करावी अशा विविध मागण्यांसाठी या आमरण उपोषणाला कंत्राटी कामगारांनी सुरुवात केली आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651545755776339968?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651545723035615232?s=20
Manmad MSEDCL Contractual Employee Agitation