मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील एका घटनेने सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मनोरुग्ण असलेल्या आईने आपल्या पाच वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली. यामुळे चिमुरडी जखमी झाली आहे. ही घटना सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे यांनी समजली. त्यांनी तातडीने त्या मुलीला आईच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर या चिमुरडीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
ही महिला परप्रांतीय आहे. त्यामुळे तिची भाषा समजून येत नाही. तसेच, जखमी झालेली ही मुलगी तिचीच आहे की पळवून आणलेली याचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चौकशी अंती ती महिला मनोरुग्ण असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर लहान मुलीला अधिक उपचारासाठी खाजगी दवाखाण्यात हलविण्यात आले आहे.
Manmad Mother Beaten 5 year old girl