मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पानेवाडी येथे दुचाकीचा अपघात झाल्यानंतर आमदार सुहास कांदे हे मदतीसाठी धावले. ते रस्त्याने जात असताना त्यांनी अपघात बघितला. त्यानंतर त्यांनी तात्काळ ॲम्बुलन्सला पाचरण केले. याच अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांनी जखमींना पुढील उपचारासाठी मनमाड येथे पाठवले. या अपघातातील जखमी हे निफाड तालुक्यातील आहेत.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यातच उन्हाचा तडाखाही जोरात आहे. त्यामुळे दुचाकीवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले आहे.
बघा, आमदारांच्या मदतकार्याचा हा व्हिडिओ
Manmad MLA Suhas Kande Help Road Accident Injured