मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर बस पलटी झाल्याची घटना घडली. मालेगाव पासून काही अंतरावरील राजस्थान ढाब्या जवळ हा अपघात झाला.
ही बस पुण्याहून शिंदखेडा येथे जात होती. बसचे लायनर चिपकल्या मुळे ब्रेक लागला नाही. त्यामुळे बस पलटी झाली. बस मध्ये होते ४१ प्रवासी होते. यातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच अनेकांनी धाव घेत जखमींना केली मदत केली.