अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेतर्फे मे महिन्यात मनमाड-वंजारवाडी- करी-माळेगाव ही बस सेवा सुरू करण्यासाठी बस प्रशासनास निवेदन दिले होते. अन्यथा आंदोलनाचा इशारा ही दिला होता. सातत्याच्या पाठपुराव्याला आज यश मिळाले असून काही दिवसानंतर आज सदर बस सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. मनमाड बस डेपोचे लाडवंजारी साहेब यांच्या उपस्थितीत युवती व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नारळ वाढवून बसची पूजा केली. बसचे चालक-मालक व लाडवंजारी साहेबांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आभार व्यक्त केले. या नंतर सर्व युवती व महिलांनी स्वतः या बस ने सटाने, वंजारवाडी करी माळेगाव व परत मनमाड असा प्रवासही केला.या वेळी प्रत्येक गावात बस चे स्वागत करण्यात आले. गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, नागरिकांनी आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांचे आभार व्यक्त केले.
मनमाड करी माळगाव या भागातील असंख्य शालेय विद्यार्थी व मनमाड शहरात येणाऱ्या नागरिकांना आता बस सेवा उपलब्ध झाल्यामुळे मोठी गैरसोय दूर झाली आहे. याप्रसंगी बोलताना संगीता बागुल यांनी आमदार सुहास अण्णा कांदे तसेच बस प्रशासनाचे आभार व्यक्त केले यांच्या प्रयत्नामुळेच आज ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली. या प्रसंगी शिवसेना महीला आघाडीच्या संगीता बागुल, युवती सेनेच्या पूजा छाजेड, शितल आरणे बुशरा शेख, कोमल भालेराव, सृष्टी देशमुख, उज्वला मिसर, पायल पवार, कोमल गुंडगळ आदी उपस्थित होते.तर माळेगाव येथे बस पोहचल्यावर तेथे ही बस चे स्वागत करण्यात आले.