अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड आणि परिसरात आज दुपारी शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शहरातील अनेक सकल भागात पाण्याचे तळे साचलेले पहायला मिळाले. प्रथमच शहरातून वाहणा-या रामगुळणा-पांझण नदीला मोठ्या प्रमाणत पूर आला. त्यामुळे नदीपात्रात असलेला गाळ, साचलेला कचरा मात्र आजच्या पूर पाण्याने वाहून गेला आहे. दोन दिवसापासून पडलेल्या पावसामुळे शेतकरी मात्र आनंदात असून, खोळंबलेल्या पेरण्याना आता जोरदार सुरुवात होणार आहे. ज्या शेतक-यांनी पूर्वी पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीच संकट यामुळे टळले आहे. गेल्या दोन दिवसा पासून सतत पावसाने हजेरी लावली असल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.