अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड – शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरी नंतर मनमाड शहरातील शिवसैनिक संतप्त झाले असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आज शिवसैनिकांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली, तर काल रॅलीच्या प्रचारार्थ लावलेले फलक पोलिसांच्या सूचनेनुसार पालिकेने उतरवली त्यामुळे शिवसैनिकां मध्ये बंडखोर आमदारा विरोधात तीव्र नाराजी पसरली. दरम्यान आज शहरातील शिवाजी चौक येथून रॅली सुरू होणार होती. त्यामुळे या परिसरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. तर रस्त्यावर बॅरिकेत लावण्यात आले होते. अखेर छत्रपती शिवाजी महाराज पुतल्याजवळच शिवसैनिकांनी निषेध करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या,ही रॅली होऊ नये म्हणून स्थानिक पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आल्याने अनेक पदाधिकारी यात सहभागी झाले नसल्याचे पहावयास मिळाल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यांची पद राहणार की त्यांना अभय मिळणार याकडे लक्ष लागले आहे.