मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील मुरलीधर नगर भागात डोक्यात बाटली फोडल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून आठ ते दहा तरुणांच्या टोळक्याने घरावर हल्ला केला. या हल्यात दगड व विटाफेक करुन परिसरात दहशत निर्माण केली. या हल्ल्यात घराचे खिडक्या, विजेचे मीटर व घरासमोर दिव्यांची फोडतोड करण्यात आली आहे. तर घरासमोर दगडांचा मोठा खच पडला होता. याप्रकरणी मनमाड पोलिसात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.