मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २९ मुलांच्या कथित तस्करी प्रकरण अटकेत असलेल्या चार शिक्षकांना मनमाड न्यायालयाने न्यायलयीन कोठाडी सुनावली आहे. या चार आरोपींची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना आज मनमाड कोर्टात हजर करण्यात आले होते. या चौघांना न्यायालयाने सेंट्रल जेलमध्ये पाठवले आहे.
भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ५९ अल्पवयीन मुलांची आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने सुटका केली केली होती. या मुलांना बिहारमधून महाराष्ट्रातील मदरशात नेण्यात येत होते. यातील २९ अल्पवयीन मुलांना भुसावळ रेल्वेस्थानकावर तर मनमाड येथे ३० मुलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी या संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.
रेल्वे बोर्डाकडून आलेल्या संदेशावरून सुरक्षा दल – लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्यात पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मुलांनी मिरजमधील मदरशात नेत असल्याचे पुढे आले होते.
Manmad Child Trafficking Teachers Court