मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड कृषी बाजार समितीच्या निवडणूकीसाठी आज मतदान होत असून आमदार सुहास कांदे आणि महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. मनमाड बाजार समितची निवडणूक प्रथमच प्रतिष्ठेची होत आहे. या निवडणुकीत माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर या निवडणुकीची तारीख व स्थळ सुध्दा बदलण्यात आले आहे.
एकूण १८ जागांसाठी होणा-या निवडणूकीसाठी एकुण ४१ उमेदवार आपले नशिब अजमावत असून त्यासाठी ७८८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक गटासाठी चुरस असल्याने संवेदनशिल ठरलेल्या बाजार समितीच्या निवडणूकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1652526397301362689?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1652526369186934785?s=20
Manmad APMC Election Voting Started