मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध कारणांमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचा अंतिम निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण या निवडणुकीत शिंदे गटाला अवघ्या ३ जागांवर विजय मिळवता आला आहे. तर महाविकास आघाडीच्या पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळाला आहे.
मनमाड बाजार समितीमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना मोठा धक्का बसला आहे. १८ पैकी १२ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. कांदे गटाला अवघ्या ३ जागा मिळाल्या आहेत. व्यापारी गटातून व्यापारी विकास पॅनल विजयी झाले आहे. हमाल मापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार संजय पवार व शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत गट निकालात महाविकास आघाडीच्या गटाला ३ जागा आणि आमदार सुहास कांदे गटाला १ जागा मिळाली.
मनमाड कृऊबा निवडणूक विजयी उमेदवार
सोसायटी सर्वसाधारण (७ जागा) –
१) आहेर पुंजाराम पोपट, १४७ (विजयी)
२) आहेर विठ्ठल काशिनाथ, १४५ (विजयी)
३) गोगड दिपक चंद्रकांत, १४९ (विजयी)
४) भाबड कैलास नामदेव,१४३ (विजयी)
५) मार्कंड आनंदा विठ्ठल,१४१ (विजयी)
आ कांदे शेतकरी विकास पॅनल
६) किशोर लहाने १५२ (विजयी)
७) आप्पा कुनगर १३९ (विजयी)
सोसायटी जनरल गटात फेरममत मोजणी चा अर्ज मागे घेतला गेला त्यामुळे फेरमतमोजणी झाली नाही.
सोसायटी विमुक्त जाती/भ.जमाती (१ जागा) –
१) धात्रक गणेश जगन्नाथ १६३ ( विजयी)
सोसायटी इ.मा.वर्ग (१ जागा) –
१) पवार संजय सयाजी १५४ ( विजयी)
सोसायटी महिला राखीव (२ जागा)
१) कराड संगिता रमेश , १५९ ( विजयी)
२) पाटील चंद्रकला अशोक १४२( विजयी)
ग्रामपंचायत गट ४ जागा:
१) उगले सुभाष जयराम १०५ (महाविकास) विजयी
२) योगेश दुर्योधन कदम (महाविकास) १०५ विजयी (आर्थीक दुर्बल)
३) लहिरे दशरथ बबन (शिवसेना) १०७ विजयी
४) बिडगर गंगाधर हरी ११४ (महाविकास) विजयी
व्यापारी गट
१) किसनदादा बंब ७० विजयी
२) रुपेश ललवाणी ७६ विजयी
हमाल मापारी गट
१) मधुकर उगले अपक्ष विजयी ७४ मते
Manmad APMC Election Result MLA Suhas Kande Politics Chhagan Bhujbal