अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मेक्सिको लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये मनमाड येथील गुरू गोविंद सिंग हायस्कुल व जय भवानी व्यायामशाळेची आकांक्षा किशोर व्यवहारे हिने भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
अतिशय चुरशीच्या लढतीत 59 किलो स्नॅच 68 किलो क्लिन जर्क असे 127 किलो वजन उचलून आकांक्षा हिने रौप्यपदक पटकावले आहे. फक्त मनमाड शहरच नव्हे तर समस्त महाराष्ट्रात वेटलिफ्टिंग मध्ये अनेक स्टार खेळाडु घडवणाऱ्या प्रशिक्षक श्री प्रवीण व्यवहारे सर यांची आकांक्षा ही खेळाडु आणि पुतणी असुन , आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेल रौप्यपदक ही समस्त भारतीय व महाराष्ट्रातील महिला खेळाडूंना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. पुन्हा एकदा दुहेरी आनंदाचा क्षण खेळाडू आकांक्षा व प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग दुसऱ्यांदा तृप्ती पाराशर यांनी समस्त मनमाडकर आणि महाराष्ट्रसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
मेक्सिको लिओन येथे सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा ने ऐतिहासिक कामगिरी करीत आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 40 किलो वजनी गटात भारतासाठी 59 किलो स्नॅच व 68 किलो क्लिन जर्क असे 127 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले मनमाड च्या क्रीडा इतिहासात जागतिक युथ वेटलिफ्टिंग मध्ये रौप्यपदक पटकावणारी आकांक्षा पहिलीच खेळाडू ठरली आहे कझाकीस्थान व कोलंबिया च्या खेळाडूंशी कडवी लढत देत असतांना आकांक्षा चे सुवर्णपदक अवघ्या एक किलोने हुकले
गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय क्रीडा प्राधिकरण पतियाळा येथे भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबिरात सुद्धा आकांक्षा ने जिद्द व मेहनतीच्या जोरावर उत्तम कामगिरी बजावली होती.
59 किलो स्नॅच चा तिसरा प्रयत्न आकांक्षा ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळवून देणारा ठरला क्लिन जर्क मध्ये 68 किलोचा दुसरा यशस्वी प्रयत्न झाल्यानंतर 71 किलो चा तिसरा प्रयत्न अयशस्वी झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले अतिशय कमी वयात जागतिक पातळीवर उत्तम कामगिरी करणारी आकांक्षा पुढील जागतिक स्पर्धेत नक्कीच सुवर्णपदक पटकविणार
आकांक्षा ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे,व भारतीय संघा बरोबर मेक्सिको येथे प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर,सचिव प्रमोद चोळकर,भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.