मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिहार येथून मदरशात शिक्षण घेण्यासाठी १५ ते १८ वर्षातील मुलांना घेऊन पाच शिक्षक सांगली येथे जात असतांना एका व्यक्तीच्या तक्रारी नंतर काही मुलांना भुसावळ तर ३० जणांना मनमाड येथे रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेत त्यांची बाल सुधार गृहात रवानगी केली.
मनमाड येथे चार सोबतच्या चार व्यक्तींना ताब्यात घेतल्यानंतर मनमाड रेल्वे पोलिसात तस्करीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची तपास यंत्रणा कामाला लागली. या मुलांना त्यांच्या पालकांनी त्यांच्या संमतीने पाठविले का याची कुठलीही कागदपत्र न सापडल्याने पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले होते. अखेर तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर पकडलेल्या मुलांचे नातेवाईक, पालक आज मनमाड येथे दाखल झाले त्यांचे जबाबा घेण्याचे काम सध्या सुरु असून आम्ही आमच्या मुलांना स्वत पाठविल्याच पालक, नातेवाईक यांच म्हणणे असून आम्ही आमचे आधारकार्ड सुध्दा घेऊन जाणा-या मौलांना दिले.
तर बिहारमध्ये मुलांना मदरशात शिक्षणासाठी पाठविले तर ते पालक घरी पोहचण्या अगोदर येऊन पोहचत असल्याने त्यांना लांब पाठवून त्यांनी शिक्षण घ्यावा यासाठी गेल्या काही वर्षापासून आम्ही मुलांना महाराष्ट्रातील सांगली येथे चांगले शिक्षणासह त्यांना सर्व सुविधा मिळत असल्याने पाठवित असल्याच पालक सांगतात.
पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतल्यानंतर पालकांशी संपर्क करायला हवा होता असे ही मत व्यक्त करत तस्करीचा गुन्हा दाखल केला. यावर नाराजी व्यक्त केली, दरम्यान मनमाड पोलिसांचे एक पथक सध्या बिहारच्या दिशेने अधिक तपास कामी गेले आहे. या प्रकरणातून नेमके सत्य काय हे तपास पुर्ण झाल्यानंतर बाहेर येईल. मात्र सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास मात्र गुप्तपणे सुरु असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Manmad 59 Childrens Guardian Police