इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याअगोदर वर्धाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र एका मोठ्या नेत्यांच्या दबावानंतर ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता प्रमुख अधिका-यांच्या बदल्या करण्यात येत आहे. त्यात बदल्यावरुन मतभेदही समोर येत आहे.
नाशिकमध्ये एकही आयुक्त त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत नसल्यामुळे आता नवीन आयुक्तांना किती काळ भेटतो हे महत्त्वाचे असणार आहे. कुंभमेळाव्याच्या तयारीची कामे सुरु असतांना आयुक्त बदल्यामुळे पुन्हा थोडासा वेग कमी होणार आहे.