मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मणीपूर येथील हिंसाचार देशातील सर्वाधिक चर्चेता आणि चितेंचा विषय ठरत आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत या विषयावरून सरकारला धारेवर धरले. त्यानंतर अमित शहा यांनी यासंदर्भात उत्तरही दिले. मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
मणीपूर येथील हिंसाचाराच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी किती गुन्हे दाखल झाले आणि किती लोकांवर कारवाई झाली, यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पूर्ण प्रयत्न होत आहे, मात्र काही घटना दुर्दैवी असल्याची कबुलीही त्यांनी दिली. मात्र प्रकाश आंबेडकर यांचे हे गंभीर आरोप हिंसाचाराच्या विषयाला वेगळ्याच वळणावर घेऊन जाणारे आहेत. मणिपूरमध्ये सोन्यापेक्षा महागडा धातू असणाऱ्या प्लॅटिनमची खाण सापडली आहे. या खाणीचे उत्खनन करण्याचे कंत्राट पंतप्रधान मोदी यांचे जवळचे मित्र गौतम अदाणी यांना देण्यात आले आहे. पण मणिपूरमधील आदिवासी हिल काऊन्सिलनं याला विरोध केला आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार घडवला जात आहे, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
संबंधित भागात खनिज उत्खनन करायचं की नाही, याचे अधिकार मणिपूर विधानसभेला नाहीत. तो अधिकार तिथे असणाऱ्या ‘आदिवासी हिल काऊन्सिल’ला आहे. त्या आदिवासी हिल काऊन्सिलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले की, या खाणींचे उत्खनन भारत सरकार करणार असेल तर आम्ही परवानगी देतो. पण खासगी कंपनी उत्खनन करणार असेल तर आम्ही परवानगी देणार नाही. ही देशाची संपत्ती आहे, त्यामुळे देशाच्या उपयोगी आली पाहिजे. या ‘आदिवासी हिल काऊन्सिल’मध्ये कुकी समुदायाची संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी खनिज उत्खननाची परवानगी नाकारली, असेही आंबेडकर म्हणाले.
हे तर दोघे यार आहेत
मागील काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये कुकी आदिवासी समुदायावर अत्याचार होत आहे. कारण मणिपूरमध्ये सोन्यापेक्षा महागडा असणारा प्लॅटिनम धातू सापडला आहे. कुकी समुदाय वास्तव्यास असलेल्या परिसरात ही प्लॅटिनमची खाण सापडली आहे. नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी १९६८ सालापासून लंगोटी यार आहेत. दोघांवर १९६८ साली एक गुन्हा दाखल झाला होता. त्याचा अजून निकाल लागलेला नाही. दोघं लंगोटी यार असल्यामुळे सरकारने अदाणींना खनिज उत्खनन करण्याचे अधिकार दिले आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.
Manipur Violence Shocking Reason Connection Mining
Gautam Adani Prakash Ambedkar PM Narendra Modi